23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रखंडणी मागाल तर मोक्का लावेन; अजित पवारांचा इशारा

खंडणी मागाल तर मोक्का लावेन; अजित पवारांचा इशारा

बीड : प्रतिनिधी
येथे बाहेरचे उद्योजक गुंतवणूक करायला येतात. त्यांना जर कोणी खंडणी मागितली तर त्यांची गय केली जाणार नाही. जर कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मोक्का लावायला मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

बीडचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, तुम्ही चुकीचे काम केले तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कामे केली जातील. कुणी या ठिकाणी रिव्हॉल्व्हर लावून फिरत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणा-या व्यक्तीचे लायसेन्स कॅन्सल करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा. चारित्र्य स्वच्छ ठेवा. कोणी पोलिस कर्मचारी राजकीय हस्तक्षेप करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पंचवीस-पंधराची कामे किंवा इतर निधी वाटायला मी आलेलो नाही.

कुणीही त्याचा गैरअर्थ काढू नये
बीड जिल्ह्यात झालेल्या कामाची मी पाहणी करणार आहे. कुठलाही अधिकारी, कर्मचारी किंवा गुत्तेदाराने चुकीचे काम केले तर त्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. धनंजय मुंडे हे दिल्लीला गेल्याने त्यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी राजकीय चर्चा होती. त्यावर बीडचे पालकमंत्री पवार म्हणाले, ते (धनंजय मुंडे) एका खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे दिल्लीला गेले होते. कुणीही त्याचा गैरअर्थ काढू नये, असे सांगत अजित पवारांनी धनंजय मुंडे मंत्रिपदावर कायम राहणार असल्याचे संकेत दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR