24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रखडसे सरपटणारे, रंग बदलणारे प्राणी

खडसे सरपटणारे, रंग बदलणारे प्राणी

चंद्रकांत पाटलांची नाव न घेता टीका

पुणे : प्रतिनिधी
मुक्ताईनगरमधील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हे रंग बदलणारे, सरपटणारे प्राणी आहेत’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर केली

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, एकनाथ खडसेंचे कुटुंबच संभ्रमात टाकणारे आहे, आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये. आधी सुनेला लोकसभेत पोहोचवले, त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे खडसे आहेत. एकनाथ खडसे हे स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण करणारे आहेत. गेल्या ३० वर्षांत एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसेच, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता. तरीही, अद्याप एकनाथ खडसे हे भाजपमध्ये सामील झाले नाहीत. त्यामुळे एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. काही दिवस वाट पाहीन आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा सक्रिय होईन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काल (दि. २) एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले होते. या बॅनरवर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांचे फोटो दिसून आले. त्यामुळे एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. काही दिवस वाट पाहीन आणि राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होईन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR