17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरखर्गे यांची आमदार धिरज देशमुख यांनी घेतली भेट

खर्गे यांची आमदार धिरज देशमुख यांनी घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दि. १९ ऑक्टोबर रोजी बंगळुरु येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर खर्गे यांच्याशी संवाद साधला.
श्री मल्लिकार्जुन खर्गे यांची आमदारह्यािधरज देशमुख यांनी भेट घेवून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी श्री खर्गे यांच्याशी आमदार धिरज देशमुख यांनी विविध विषयावर चर्चा केली. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यासंदर्भानेही यावेळी चर्चा झाली. श्री खर्गे यांच्या भेटीनंतर आमदार धिरज देशमुख यांनी श्री खर्गे यांनी केलेले मार्गदर्शन नेहमीच नवी ऊर्जा देणारे असते. तीच अनुभूती आज पुन्हा एकदा घेता आली, अशी भावना व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR