20.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूरखाजगी ट्रॅव्हल्सना रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद

खाजगी ट्रॅव्हल्सना रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद

लातूर : प्रतिनिधी
लातुर शहरात दि. १७ सप्टेंबर रोजी ‘श्री’चे विसर्जन असल्याने शहरात विविध मंडळातर्फे वाजत-गाजत ‘श्री’ ची मिरवणुक काढण्यात येते. त्यामुळे जनतेच्या सोयीच्या व सुरक्षीततेच्या दृष्टीने लातूर शहरातील विसर्जन मार्गावर वाहतुक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणे आवश्यक असल्­याने मंगळवारी सकाळी १० ते रात्री २३.५० वाजेपर्यंत खालील मार्गावरील वाहतुक बंद करुन पर्यायी मार्गावर वळविण्­यात येत आहे.

मंगळवारी सकाळी १० ते रात्री २३.५० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार मार्ग- पी. व्­ही. आर. चौक ते दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल, महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाईपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्­या वाहनांना(मोटार सायकल, थ्री व्­हीलर, एस.टी.बसेस, ट्रक,टेम्­पो,टॅक्­सी, ट्रॅव्­हल्­स,मिनीडोर इ.) बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आदर्श कॉलनी, राजीव गांधी चौक ते बांधकाम भवन स्­वामी विवेकानंद चौक ते शाहू चौक,गंज गोलाई सुभाष चौक,दयाराम रोडने खडक हनुमान ,पटेल चौक,सिध्­देश्­वर चौक ते सिध्­देश्­वर मंदीर मंगळवारी सकाळी १० ते रात्री २३.५० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग- पी.व्ही.आर चौकातुन छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहरात येणारे एस.टी.बसेस पी.व्ही.आर.चौकातुन ंिरगरोडने नवीन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथिल बसस्टॅन्डचा वापर करतील.बाकी सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील. औसा रोडने शहरात येणा­ज़्या एस.टी.बसेस या वाडा हॉटेल येथून ंिरग रोडने, खाडगाव टी पर्ॉइंट, पिव्हिआर चौक, रेल्वे स्टेशन चौक, नविन रेणापूर नाका मार्गे जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र 2 चा वापर करतील. तसेच चार चाकी, तीन चाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोड एल.आय.सी.कॉलनी, नाईक चौक,सुतमील रोड या मार्गाचा वापर करतील.

रेणापुर रोडने शहरात येणा­ज़्या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथील बसस्थानकाचाच वापर करतील.रेणापुर रोडने येणारी चार चाकी,तीन चाकी व दोन चाकी वाहने ही जुना रेणापुर नाका बालाजी मंदीर व खोरी गल्ली या मार्गाचा वापर करतील. गंजगोलाई-सुभाष चौक-दयाराम रोड मार्गे-खडक हनुमान-सिध्देश्वर मंदिर या मिरवणुक मार्गावर सर्व वाहनास सदरचा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नांदेड रोडने शहरात येणाज़्या एस.टी.बसेस या गरुड चौक, सिद्धेश्वर चौक,नविन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथिल बसस्थानकाचा वापर करतील. तसेच शहरातील वाहतुकीसाठी जनतेस राजस्थान विद्यालय ते दयानंद गेट या पॅरलल रोडचा, राजीव गांधी चौक ते महात्मा बस्वश्वेर महाविद्यालय – रमा चित्रपटगृह-खोरी गल्ली झ्र शिवनेरी लॉज या मार्गाचाच अवलंब करावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR