24.3 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeलातूरखुनातील फरार आरोपी दोन महिन्यांनंतर गजाआड 

खुनातील फरार आरोपी दोन महिन्यांनंतर गजाआड 

लातूर : प्रतिनिधी
शहरातील गंजगोलाई परिसरात १० ऑक्टोबरच्या रात्री धारदार शस्त्राने एकाचा खून करून फरार असलेल्या सुलतान गफार कुरेशी रा. शहावली मोहल्ला लातूर यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून अटक केली आहे. त्याने त्याचाच मित्र असलेला पैगंबर हाजी मलंग सय्यद रा. अंजली नगर लातूर याचा तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून खून केला होता. या फरार आरोपीस दोन महिन्यांनंतर गजाआड करण्यात आले आहे.
आरोपी सुलतान गफार कुरेशी याने त्याच्या ओळखीचा व मित्र असलेला पैगंबर हाजीमलंग सय्यद, वय २८ वर्ष, राहणार बाभळगाव, (सध्या राहणार अंजली नगर) लातूर याचे सोबत किरकोळ कारणावरून भांडण तक्रारी झाल्याने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने, गळ्यावर मारून खून केल्याची घटना घडली होती. या बाबत मयाताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार होता.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून गुन्ह्यातील फरार आरोपी सुलतान कुरेशी याचा शोध घेण्यात येत होता. तो दारू व नशापाणी करण्याच्या सवयीच्या असल्याने त्याला त्याच्या घरातून हाकलून दिले होते. तो इतरत्र कोठेही राहून मिळेल ते काम करून उपजीविका भागवीत होता. दरम्यान विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी सोलापूर व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये लपून वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकातील पोलीस अमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे जमीर शेख यांचे पथक तात्काळ सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील एका छोट्याशा गावात पोहोचून माहितीची शहनिशा करून गावात सापळा लावून अतिशय सीताफिने नमूद गुन्ह्यातील फरार आरोपीला दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हे हे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सायबर सेलचे पोलीस अमलदार गणेश साठे, संतोष देवडे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR