नाशिक : वृत्तसंस्था
देशात १,३३७ रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी करण्याची कामे हाती घेतली आहेत. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात होत आहेत. मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी होत आहे. तसेच अजनी, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, हडपसर, इतवारी, जालना, लासलगाव, नांदगाव, खेडगाव (सोलापूर), हातकणंगले, ग्रँट रोड यासारख्या अनेक रेल्वे स्थांकांचे रेल्वे डिझाईन तयार झाले आहे. त्याचीही काही काम सुरू झाली आहेत.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात ११०० कोटींची रेल्वेची कामे होत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मंजूर केले आहेत. रिजनल ट्रेन कॉन्सेप्ट मोदीजी घेऊन आले आहेत. नमो भारत रॅपिड असे नाव आहे. महाराष्ट्रात नवीन रेल्वे ट्रॅकची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.
नाशिक आणि पुणे या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु होते. परंतु त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला नाही. नाशिकमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे सुरक्षा दलाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुढे नेण्यासाठी एक अडचण निर्माण झाली आहे. ती अडचण सोडवली जात असून त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे, असे सांगितले.
पुण्यात चार रेल्वे टर्मिनल झाल्यानंतर पुण्याची रेल्वे क्षमता वाढणार आहे. पुणे येथे नारायणपूर, खोडा येथे ४३ देशांनी प्रकल्प केला आहे. नाशिक – शिर्डीवरुन दक्षिण भारत गाठता येईल, यासाठी नवीन योजना तयार केली जात आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन नव्याने तयार होणार आहे. येथे रेल्वेची जमीन वापरून कोल्ड स्टोरेज उभारण्याचा प्रस्ताव अनेकांनी दिला आहे. त्यावर विचार सुरु आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.