बीड : प्रतिनिधी
खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले आहेत. राजस्थानातून बिश्नोई समाजाचे काही लोक मुंबईत आणले गेले. धसांना हरणाचे मांस कसे पुरवले असे त्या लोकांना सांगितले.बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवायचे होते असा गंभीर आरोप धस यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ माजली आहे.
खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, त्याच्यावर अनेक आरोप झाले होते, त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आला होता. आणि जे मटण होते, ते सुरेश धस यांना दिले जात होते, असाही आरोप झाला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एक गौप्यस्फोट केला आहे.
मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता. बिश्नोई गँगला देखील पाचारण करण्यात आले होते, असे धसांनी म्हटले असून त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे आणि गंभीर आरोपांमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे. या कटामध्ये आणखी कोणी सामील आहे का, सुरेश धसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्यासंदर्भात त्यांनी गृहविभागाला काही पत्र लिहिले आहे का किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी या संदर्भात काही बातचीत केली आहे का? याबद्दल अद्याप कोणतीही सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
खोक्या भोसलेचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत होते. खोक्या भोसलेने हरणांची शिकारसुद्धा केल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या माध्यमातून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचे मांस पुरवत होता, असे आरोपही काही लोकांनी केले होते. याच आरोपाच्या मुद्यावर बोलताना आता धस यांनी एका मुलाखतीत हा आरोप केला आहे. बिश्नोई गँगला मुंबईत आणलं गेलं आणि माझ्या खुनाचा डाव, कट रचण्याचा प्रयत्न झाला असा धक्कादायक खुलासा धस यांनी एका खासगी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला.
ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणावी लागेल, कारण खोक्या भोसलेचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. खोक्या भोसले हा बराच काळ फरारही होता. नंतर त्याला अटकही झाली, त्याचे घरही पाडण्यात आले होते. त्याच्या घरात वन्यप्राण्याचे वाळलेले मांस सापडल्याचा मुद्दाही समोर आला होता. आणि त्याचाच आधार धरून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचे मांस पुरवत होता अशा स्वरूपाचा गंभीर आरोप करण्यात आला होता.