19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरगंठन चोरी; ३ अल्पवयीनांकडून मुद्देमाल जप्त

गंठन चोरी; ३ अल्पवयीनांकडून मुद्देमाल जप्त

लातूर : प्रतिनिधी

लातूर शहरातील विराट हनुमान नगर परिसरात एक महिला शतपावली करत असताना तीन अल्पवयीनांनी तिच्या गळ्यातील गंठण जबरदस्तीने हिसकावले होते. विवेकानंद चौक पोलिसांनी या प्रकरणी तपास करून तात्काळ त्या तिघांनाही ताब्यात घेवून त्यांच्याकडून ९० हजार रूपयेकिंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणा-या चोरी व चैन स्रॅंिचग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून सदर पथकामार्फत गुन्ह्यांचा तपास करण्यात येत होता.

दरम्यान विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे चोरलेले सोन्याचे मिनी गंठण विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन अल्पवयीन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते लातूर जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातील राहणारे असून लातूर मध्ये वेगवेगळया महाविद्यालयात शिक्षण घेत असून एका होस्टेलमध्ये राहतात. नवीन मोबाईल घेण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी घरासमोर शतपावली करणा-या महिलेच्या गळ्यातील गंठण बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेल्याचे सांगितले.

तसेच नमूद तीन विधी संघर्ष बालकांकडून गुन्ह्यात चोरलेला सोन्याचा मिनीगंठण जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास व विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी. लिंगे हे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी. लिंगे, पोलीस अमलदार विनोद चलवाड, अतुल काळे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR