27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरगगनभेदी जयकारात शिवभक्तीला उधाण

गगनभेदी जयकारात शिवभक्तीला उधाण

लातूर : प्रतिनिधी
रयतचे राजे, सामाजिक विषमतेला मुठमाती देणारे राजे, बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती लातूर शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुर्णाकृती अश्वरुढ पुतळ्यासमोर हजारो शिवभक्त नतमस्तक झाले. चौका-चौकात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिवगर्जनेने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. सायंकाळी निघालेल्या भव्य, दिव्य मिरवणुकांनी उत्साहात रंग भरला. गगनभेदी जयकारात शिवभक्तिला उधाण आले होते.
यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणते राजे, क्रांतीकारांचे प्रेरणास्थान असलेले राजे, शेतक-यांना, कष्टक-यांना, अबलांना आधार देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव अतिश्य उत्साहात साजरा करण्यात आला. अलोट गर्दी आणि अभूतपूर्व उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती अश्वरुढ पुतळ्यास छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन केले.
दुचाकी रॅलीने लक्ष वेधले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसरातून दुचाकी रॅली काढली.  रिंग रोड, गरुड चौक, स्वामी विवेकानंद  चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, जुने गुळ मार्केट चौक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘राष्ट्रमाता जिजाऊंचा विजय असो’, ‘संभाजी महाराज की जय’ च्या जयघोषात ही दुचाकी रॅली काढण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR