25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी ४९५३ बसेस फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी ४९५३ बसेस फुल्ल

मुंबई : गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखे समीकरण आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सवात गावी जाणा-या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी पहिली पसंती राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला दिली आहे. मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणा-या सर्व एसटी बसेस फुल्ल झाल्या आहेत.

येत्या ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. कोकणात गणपतीसाठी एसटीच्या ४२०० गट आरक्षणासह एकूण ४९५३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. मुंबईतून कोकणात गणपती उत्सवाला जाणा-या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान ५००० जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.

चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी
येत्या ३ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्­सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR