26.1 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रगर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहात पकडले

गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहात पकडले

चौकशी सुरू; मोठं रॅकेट असण्याची शक्यता

बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने गर्भलिंग निदान करताना डॉक्टरला रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. पी सी एन डी टी कायद्या अंतर्गत जिल्ह्यात तीन कारवाई करण्यात आल्या आहेत. या पथकाने सोनोग्राफी मशिन्स सील केल्या.
गर्भपात करणा-या डॉक्टर अमोल भोपळे यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट पुढे येण्याची शक्यता जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वर्तविली असून तसा तपास केला जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकाने जिल्ह्यात ३ ठिकाणी पी सी एन डी टीच्या कायद्यन्वये कारवाई केल्या आहेत. त्यात नांदुरा, मेहेकर आणि रिसोड या ठिकाणी रेड करीत दोष आढळल्याने सोनोग्राफी सील केल्या आहेत.

तसेच काल एका महिलेचा पाठलाग करीत वाशिमच्या रिसोड येथील शिव मुळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूती गृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती.

त्यानंतर बुलडाणा, वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणा-या औषधं आणि साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी डॉ. अमोल भोपाळे उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR