23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रगावोगावी रंगणार महायुतीची ‘डब्बा पार्टी’

गावोगावी रंगणार महायुतीची ‘डब्बा पार्टी’

मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला २३० जागांवर यश मिळाले. त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला १३२, शिवसेनेला ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यानंतर दुस-यांना नरेंद्र मोदी मुंबईत आले. यावेळी त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांना अनेक टिप्स दिल्या. तसेच गावागावात महायुतीने डब्बा पार्टीचे आयोजन करावे, असा सल्ला दिला. मोदी यांच्या सल्ल्यामुळे आता महायुतीकडून गावागावात डब्बा पार्टी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना महायुती म्हणून संघटन वाढविण्यावर भर द्या, असे आवाहन केले. महायुतीमधील एकोपा वाढण्यासाठी मोदी म्हणाले, मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार आहेत पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेटी द्या. तसेच महायुती अधिक घट्ट करण्यासाठी गावो गावी डब्बा पार्टी आयोजन करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उदाहरण आमदारांच्या बैठकीत दिले. अनेक वर्ष काँग्रेसने सत्ता कशी टिकवली याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस एका पंचवार्षिकमध्ये रस्ता करू, असे आश्वासन देते. दुस-या पंचवार्षिकला नकाशा दाखवला जातो. तिस-या पंचवार्षिकला कामाची सुरुवात करण्याची घोषणा करतात. आमदारांनी आपल्या मतदारसंघाची काळजी घेताना स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वाचे लक्ष असते. त्यामुळे माध्यमांशी बोलताना काळजी घ्या. आपल्या हातून चुकीच्या बाबी घडणार नाहीत याकडे लक्ष द्या, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या आमदारांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमध्ये भाजपकडून सत्ता केंद्र कशा प्रकारे चालवले जात आहे, याचे उदाहरण देण्यात आले. गुजरातमध्ये ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यामध्ये भाजपने एक हाती सत्ता कशी राखली आहे हे मोदी यांनी सांगितले. महाराष्ट्रात देखील महायुती अशाच प्रकारे काम करेल, अशी आशा व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR