21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरगुडसूरकर यांच्या पुस्तकाचे केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

गुडसूरकर यांच्या पुस्तकाचे केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

उदगीर :  प्रतिनिधी
हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील मराठवाड्याचे योगदान अधोरेखित करणा-या धनंजय गुडसूरकर यांच्या’ खळाळल्या शृंखला’ या  ग्रंथाचे प्रकाशन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुंबई येथे झाले . हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने गुडसूरकर यांनी मुक्तीसंग्रामाच्या योगदानाचा संक्षीप्त आढावा या ग्रंथात घेतला आहे. शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री  दीपक केसरकर यांच्या हस्ते व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री  संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी प्रास्ताविक केले.  हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याचे योगदान मोठे असून या लढ्यचा इतिहास नव्या पिढीपर्यंत  पोहोचविण्यासाठी गुडसूरकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे असे मत मंत्री केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. धनंजय गुडसूरकर यांनी पुस्तकामागची भूमिका विशद
केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR