लातूर : प्रतिनिधी
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांच्या हस्ते सकाळी १०.०५ वाजता झेंडा (ध्वज) पुजन होऊन शेतमाल सौद्यास सुरुवात करण्यात आली. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हरभरा, तुर, सोयाबीन या शेत मालाची आवक मोठया प्रमात वाढली.
तर हरभरा आणि तुरीच्या दरात १०० ते १५० रूपयांची तेजी दिसून आली. यावेळी लातूर बाजार समितीचे सचिव अरविंद पाटील, भास्कर शिंदे, आडत असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, दिनकर मोरे, राजू मुंदडा, अमर पवार, भरत डोपे, चवळे, खंदाडे, जाधव, संजय माने, बालाजी जाधव, माणिकराव पाडोळे, लखन साबळे, कर्मचारी वृंद, सर्व संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. गुढी पाडवा हा शेतक-यांचा सर्वात मोठा सण आहे. शेतक-यांचा आर्थिक विकास व्हावा, वृध्दी, सुख समृद्धी यावी शेतमालाला चांगला भाव यावा यासाठी प्रयत्नशील शेतकरी बांधवांच्या उपस्थित झेंडा पूजन करून बाजार समितीच्या आवारात गुढी पाडव्याच्या नव्या वर्षापासून शेतमाल खरेदी-विक्रीला सुरूवात झाली आहे.