जय शाह यांनी ट्विट करून दिली माहिती
नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी आता गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटनंतर गंभीरच्या प्रशिक्षकपदी निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
आयपीएल सुरू असतानाच जय शाह यांची गंभीरशी याबाबत चर्चा झाली होती. कारण द्रविडचा बीसीसीआयसोबतचा करार टी-२० वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येणार होता. त्यामुळे बीसीसीआयने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. पण गंभीर यांनी अर्ज केला नव्हता. पण जय शाह यांनी गंभीरला भारताच्या प्रशिक्षकपदाबाबत विचारणा केली होती. त्यानंतर गंभीर यांनी भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अधिकृतपणे अर्ज केला होता. अखेर आज जय शाह यांनी गंभीर हा भारताचा पुढील प्रशिक्षक असेल, हे स्पष्ट केले. जय शाह यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये गंभीरची निवड का करण्यात आली, हे स्पष्ट केले आहे.
गंभीर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा प्रशिक्षक होता. त्यानंतर लखनौच्या संघाचा प्रशिक्षक राहिला. यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरचा मालक शाहरुख खानने गंभीरला आपल्या संघात येण्याची विनंती केली होती. त्यानंतर गंभीर केकेआरचा मार्गदर्शक झाला. गंभीरच्या मागर्Þदर्शनाखाली केकेआरने आयपीएलचे जेतेपदही जिंकले.