लातूर : प्रतिनिधी
गेली चार ते पाच दिवसापासून गौरी-गणपती उत्सवाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर शहरातील फळ बाजारात फळांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. सण-उत्सवात फळांना मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. गेल्या काही दिवसापासून शहरातील फ्रुट मार्केटमध्ये फळांची आवक वाढण्यात सुरूवात झाली आहे. संध्या बाजारात फळांना मागणी मागणी वाढत असल्याने शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारची फळे उपलब्ध आहेत. यात संत्री, मोसंबी, सफरचंद, पेरू, पपई, केळी, डॅगनफ्रूट, चिकू, अॅपल, आवळा अशी विविध फळे मोठया प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहे.
गौरी-गणपती उत्सवामुळे बाजारात फळांची मोठी आवक होत असल्याने दर देखील आवाक्यात आहेत. संत्री १०० रुपये किलो दराने मिळत आहे. सफरचंद २०० ते २५० रुपये किलो दराने मिळत आहे. पेरू ८० ते १०० रुपये किलो दराने मिळत असल्याची माहिती फळ विक्रित्यांनी दिली. जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून शहरातील मार्केट यार्डात फळांची आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येत्या काही दिवसांत आणखी आवक वाढण्याची शक्यता विक्रीत्यांनी वर्तविली आहे. सध्या सर्वाधिक मागणी ही संत्री, डॅगनफ्रूट, सफरचंद, आलुबुखार या फळांना आहे. यात संत्री, मोसंबी, सफरचंद, केळी, चिकू ही फळे खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल असल्याचे विक्रीत्यांनी सांगितले.