26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरघनसरगाव येथे जुनाट रोहित्राला वेड्या बाभळींचा विळखा

घनसरगाव येथे जुनाट रोहित्राला वेड्या बाभळींचा विळखा

रेणापूर :  प्रतिनिधी
तालुक्यातील घनसरगाव येथे वीजपुरवठा करणा-या जुन्या रोहित्रला (डीपी) काटेरी वेड्या  बाभळीनी वेढले आहे. रोहित्राचा  बिघाड झाल्यास दुरुस्तीवेळी  मोठी कसरत करावी लागते. काटेरी बाभळी तोडून नविन रोहित्र बसविण्यात यावे, तसेच गावात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याचीही दुरुस्ती करावी  अन्यथा ग्रामस्थासह आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रमोद कापसे यांनी मावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला.
   घनसरगाव येथील रोहित्राची (डीपी ) दुरवस्था झाली. वारंवार वीजपुरवता खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. रोहित्राला चारी बाजूंन्ांी काटेरी वेड्या  बाभळींनी वेढा दिल्याने रोहित्र दिसत् नाही, रोहित्रात  बिघाड झाल्यास किवा फ्युज गेल्यास जीव मुठीत धरून रस्ता काढीत  जावे लागते.
रात्री अपरात्री वीज गेल्यास रोहित्रा कडे कोणी  फिरकत नाही. रोहित्राची अवस्था धोकादायक  झाली आहे. काटेरी बाभळी तोडून रोहित्राची दुरुस्ती करावीकिंवा नवीन रोहित्र बसवावे. गावात ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकाळत असल्याने दुर्घटना होण्याची भिती आहे. विजेच्या तारासह रोहित्राची दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव प्रमोद कापसे यांनी दिला आहे. या निवेदनावर श्रीरंग माने, गणेश मदने, गोपाळ  शिं्ांदे, सुरेंद्र  शिंदे, नरेंद्र शिंंदे, उमेश शिंंदे ‘ भाऊसाहेब जाधव, जयव वासूद, गमेश मदने, दत्ता  डिघोळे , नाजिर पठाण, महादू  आडसुळे, शरद  सूर्यवंशी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR