17.7 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरचमेली, कडाका, उमरान बोरांची आवक वाढली

चमेली, कडाका, उमरान बोरांची आवक वाढली

लातूर : प्रतिनिधी
नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम मागील काहीं दिवसांपासून सुरु झाला आहे. यंदा पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम चांगल्या प्रतिचा राहील, असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त्त केला आहे. तर यंदा बोरांच्या उत्पादानात वाढ झाल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
दिवाळीनंतर बाजारात बोरांची आवक सुरु होते. ती हळूहळू वाढत जाते, डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपत असतो. सध्या लातूर बाजारात सरासरी प्रति दिवस १०० ते १५० गोण्या इतकी आवक होत आहे. सध्या घाऊक बाजारात बोरांना मागणी वाढली असून, येणा-या काही दिवसात आणखी मागणी वाढेल. सध्या लातूर बाजारपेठेत सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, मोहोळ, खंडाळी आदी गावांतून बोरांची आवक होत आहे. यामध्ये चमेली, कडाका, उमराण या बोरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅपल बोरांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आकाराने मोठे, रंगाने हिरवे आणि गर जास्त असलेले ही बोरे आता लोकप्रिय होऊ लागले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरांना लातूरच्या बाजारात मागणी वाढली आहे. लातूर बाजारपेठेत बोरांची गेल्या आठवड्यापासून आवक होण्यास सूरुवात झाली आहे. सध्या सुरुवातीला बोरांची कमी आवक होत आहे. डिसेंबरनंतर आवक वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात बोरांचे उत्पादन कमी झाले आहे. लातूर मार्केट यार्डात आवक होणारी बोरं चांगल्या प्रतीची आहेत. उत्पादनात वाढ झाल्याने घाऊक बाजारात बोर दर अल्पश आहे. त्याचप्रमाणे घाउक बाजारात कडाका बोर  ५० ते ६० रुपये किलो, अ‍ॅपल बोर ५० ते ६० रुपये किलो, चमेली बोर २० रुपये किलो, उमराण बोर ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR