17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeसोलापूरचिकुन गुनियाच्या प्रतिबंधासाठी डासांपासून दूर रहावे : डॉ. संजीव ठाकूर

चिकुन गुनियाच्या प्रतिबंधासाठी डासांपासून दूर रहावे : डॉ. संजीव ठाकूर

सोलापूर : सध्या चिकुन गुनियांची रुग्ण संख्या वाढत आहे. सध्या दररोज पाचपेक्षा जास्त रुग्ण चिकुन गुनियाची लक्षणं असलेली दाखल होत आहेत. यामुळे ताप येण्यासोबत शरीरावर रॅशेश दिसत आहेत. यामुळे नागरिकांनी शक्यतो डासांपासून बचाव करावा.असे व्ही. एम. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले.
डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ताप, सर्दी, डेंग्यूसह आत शहरात चिकुन गुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दिवसातून पाचपेक्षा जास्त रुग्ण चिकुन गुनियाच्या लक्षणांच्या उपचारासाठी दाखल होत आहेत. शिवाय खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, वाढत्या डासांमुळे शहरवासीय हैराण झाले असून हिवताप विभाग व मनपाकडून कधी उपाययोजना करण्यात येईल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चिकुनगुनिया ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. जो संक्रमित मादी डास, एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस यांच्या चाव्यांद्वारे पसरतो. रात्री चावणारे डास हे चिकुन गुनियासाठी महत्त्वाचे वाहक नाहीत. या आजारात संसर्ग होऊन अचानक दोन ते बारा दिवस ताप येतो आणि लहान सांध्यांना सूज येण्यासोबत सांधे दुखीचा त्रास होतो. कधीकधी, सांधेदुखी अनेक महिने टिकून राहते. काही रुग्णांना पुरळदेखील येते.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दररोज दीड हजारापेक्षा जास्त रुग्ण हे उपचारासाठी येत आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे ताप, सर्दी या आजारांसाठी येत आहेत. यातील काही प्रमाणात चिकुन गुनियाची लक्षणे आहेत, अशी माहिती अधिकऱ्यांनी दिली. चिकुन गुनियामध्ये सांधेदुखी आणि ताप ही सामान्य लक्षणे आहेत. शिवाय डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांधे सूज येणे किंवा पुरळ येणे यांचा समावेश असू शकतो. शिवाय, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांधे सुजणे, पुरळ सामान्यतः आजारपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुरू होते. पुरळ अनेकदा खाज सुटते आणि संपूर्ण शरीरावर पसरते, अशी माहिती वैद्यकीय तज्ञांनी दीली.आतापर्यंत, या विषाणूवर कोणताही विशिष्ट उपचार किंवा उपाय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिबंध हा त्यापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR