24.1 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeअंतरराष्ट्रीयचीनकडे अत्याधुनिक फायटर जेट

चीनकडे अत्याधुनिक फायटर जेट

बिजींग : वृत्तसंस्था
चीनने अलीकडेच नव्या पिढीची दोन स्टिल्थ फायटर जेट विमानांचे प्रदर्शन घडविले. लष्कराचे आधुनिकीकरण करण्याचा चीनचा जो वेग आहे, तो खरंच थक्क करुन सोडणारा आहे. चीनने सहाव्या पिढीची फायटर जेट विमाने दाखवली. हा जगासाठी खासकरुन अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे. कारण अमेरिकेकडे आता पाचव्या पिढीची स्टिल्थ फायटर विमाने आहेत. त्यांनी सुद्धा सहाव्या पिढीची फायटर जेट्स विकसित केलेली नाहीत. चीनची ही प्रगती पाहून इंडियन एअर फोर्सच्या प्रमुखांनी एक महत्त्वाचे विधान केले. ‘खासगी क्षेत्राच्या सहभागाने भारताने संरक्षण उत्पादन आणि संशोधन क्षेत्रात स्वावलंबी बनावे’ असे म्हटले आहे.

आज जगामध्ये अस्थिरता आहे. युद्ध आणि स्पर्धा आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या लष्करीकरणामुळे उत्तर आणि पश्चिम सीमेवर आपल्या काही चिंता आहेत, प्रश्न आहेत, असे एअर चीफ मार्शल ए.पी.सिंह म्हणाले. ‘चीनने त्यांच्या एअर फोर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. नुकतीच त्यांनी त्यांची स्टिल्थ फायटर विमाने दाखवली’ असे ए.पी.सिंह म्हणाले. स्वदेशी बनावटीची तेजस फायटर विमाने सुपूर्द करण्याच्या मंद गतीवर त्यांनी नाराजी बोलून दाखवली.

भारताच्या शेजारी असलेल्या होतान एअर बेसवर चीनची फायटर विमाने तैनात आहेत. चीन ही फायटर जेट्स पाकिस्तानला देणार असल्याची बातमी आली होती.

पाचव्या पिढीच्या फायटर विमानांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रडारला सापडत नाहीत. रडारला चकवा देण्याच्या क्षमतेमुळे शत्रूच्या प्रदेशात अत्यंत घातक आणि खोलवर हल्ला करता येतो. भारताकडे सध्या राफेलच्या रुपाने ४.५ जनरेशनची फायटर विमाने आहेत. अमेरिकेकडे पाचव्या पिढीची फायटर विमाने आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR