26.2 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमनोरंजनचेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक

हैदराबाद : वृत्तसंस्था
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली. ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंडूंब गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याविरोधात बुधवारी त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी त्याने केली होती. चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ४ डिसेंबर रोजी घटना घडल्यानंतर ५ डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या तीन जणांना अटक केली. तर अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR