चेन्नई : बहुजन समाज पार्टीचे (बीएसपी) तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांची चेन्नईत त्यांच्या घराजवळच ६ जणांनी हत्या केली. आरोपी पेरंबूर भागातील सदायप्पन स्ट्रीटवर त्यांना चाकू मारून फरार झाले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आर्मस्ट्रॉंग पेरंबूरजवळ सेम्पियममध्ये गर्दीच्या ठिकाणी मित्र आणि समर्थकांसोबत बोलत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. तिघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी हत्या केली.