28.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

नौदलाने स्थापन केली चौकशी समिती

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला पुतळा पडल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. हा पुतळा पडल्याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर भारतीय नौदलाने तात्काळ या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. भारतीय नौदलाने याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय नौदलाच्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मात्र पुतळ्याला हानी झाल्याने नौदल चिंतेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR