17.1 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeजरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, पवारांचे राजकारण : राज ठाकरे

जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, पवारांचे राजकारण : राज ठाकरे

जे करायचे ते करा, माझ्या नादी लागू नका!

संभाजीनगर : प्रतिनिधी
माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जरांगे पाटील यांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणा-या या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत. काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्या नादी लागू नका. नाहीतर माझी पोरं काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही, असा आक्रमक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
या राजकीय नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, माझं मोहोळ उठलं तर यांना निवडणुकांमध्येही सभाही घेता येणार नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणावर हल्लाबोल करताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग असेल तर तुम्ही त्यांच्यावर टीका करा. पण त्यासाठी समाजात कशाला भांडण लावत आहात? शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं म्हणतो. याचा अर्थ मतांसाठी या लोकांकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
मराठवाड्यात जे जातीचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये काही पत्रकारांचाही समावेश आहे. धाराशिवमध्ये जेव्हा माझ्याकडे येऊन काही लोकांनी घोषणा दिल्या तेव्हा त्यांना उसकवणारे काही पत्रकारच होते. कोणत्या पत्रकाराला कुठे कंत्राट मिळालं आहे, कोणाला एमआयडीसीची जागा मिळाली आहे, ही सगळी माहिती माझ्याकडे आली आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR