17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंनी घेतली मुस्लिम, बौद्ध धर्मगुरुंची भेट; ३ तारखेला भूमिका करणार जाहीर

जरांगेंनी घेतली मुस्लिम, बौद्ध धर्मगुरुंची भेट; ३ तारखेला भूमिका करणार जाहीर

जालना : प्रतिनिधी
आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. पण आम्हाला त्रास देणा-यांना मात्र सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. येत्या ३ तारखेला भूमिका जाहीर करणार आहे. ३तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यातील एकच राहील, बाकीच्यांनी फॉर्म काढायचे आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले. आज मनोज जरांगे पाटील यांनी सज्जाद नोमांनी, आनंदराज आंबेडकर यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

मराठ्यांनी इथून पुढे आझाद म्हणून जगाव असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मायक्रो ओबीसींना , शेतक-यांना तुम्ही काय दिलं? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. आता परिवर्तन होणार आहे. आम्हाला देवेंद्र त्यात्यांनी लै शिकवलं असे म्हणत जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. आम्ही लोकशाही मार्गाने चाललोय. कधी जात म्हणून मी बघणार नाही असेही ते म्हणाले. सध्या शेती मालाला दर नाही, दुधाला दर नाही असेही जरांगे म्हणाले.

मराठा, मुस्लिम, दलित एकत्र

आम्ही धोक्यात आहोत तर मग हे हिंदू का म्हणत नाहीत की गरीब मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. एकमेकांच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही. मी कट्टर हिंदू आहे. आम्ही सत्ता परिवर्तन करणार आहोत असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

लोकशाही मार्गाने पुढे

आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. कोणीही दादागिरी करणार नाही असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जे नाव सांगेल त्यांनीच उमेदवारी ठेवायची, बाकीच्यांनी अर्ज काढून घ्यायचे असेही मनोज जरांगे म्हणाले. लोकशाही मार्दाने लढा, आपल्या जागा सगळ्या ठिकाणी निवडून येतील असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, दलितांना काय दिले आहे असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR