20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरजरांगे यांच्या सभा आयोजकांवर गुन्हा

जरांगे यांच्या सभा आयोजकांवर गुन्हा

रेणापूर : प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन रेणापूर ंिपंपळ फाटा येथे शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी करण्यात आले होते मात्र वेळेची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून ११ आयोजकांवर रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची तीव्र पडसाद तालुक्यासह जिल्हाभरात उमटले आहेत. मराठा बांधवातून तीव्र संतप व्यक्त करण्यात येत आहे लातूर ते अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्गावर ंिपपळफाटा रेणापूर येथे तालुका सकल मराठा बांधवाच्या वतीने २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले हाते मात्र ७ ची वेळ आसताना जरांगे पाटील यांची सभा उशीरला सुरु झाली.

या सभेच्या आयोजकांनी सर्वोच्य न्यायालयाचे आदेशाचे आधिन राहून सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सभा घेण्याचा वेळ देण्यात आला असताना सदर सभा ही रात्रीचे १०.२५ वाजता सुरु करुन ११ वाजेपर्यंत सुरू ठेवली त्यामुळे यातील आयोजकांनी त्यांना नेमुन दिलेल्या वेळेव्यतिरिक्त अधिक वेळ सभा सुरू ठेवून पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे व परवानगीचे तसेच जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस कर्मचारी किरण मडोळे वय ४५ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सभेचे आयोजक गोंिवंद दिलीपराव पाटील रा. रेणापुर, दत्ताञय शिवाजी पाटील रा. कामखेडा, अ‍ॅड रमेश रामराव खाडप रा. लखमापूर, कुलदीप राजकुमार सूर्यवशी रा. आरजखेडा, भागवत शिंंदे रा. डिगोळ देशमुख,अ‍ॅड.श्रीकांत सूर्यवंशी रा. घनसरगांव, योगेश देशमुख रा. वाला, संतोष शिंदे रा. रेणापूर, सुधाकर माने रा. रेणापूर, विशाल भोसले रा. खरोळा, सुरेश चव्हाण रा. गरसुळी या ११ आयोजकांवर गुरनं ४३४ / २०२३ कलम १८८ भा.द.वि सह कलम १३५ मपोका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बीट जमादार
तपास अनंत बुधोडकर हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR