जळकोट : ओमकार सोनटक्के
अंगामध्ये जीद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची ताकद असेल तर अत्यंत सामान्य परिस्थिती असली तरी यश मिळवायला वेळ लागत नाही. हे जळकोट येथील सागर बेलदरे या मुलाने दाखवून दिले आहे. सागरने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यांची राज्य कर निरीक्षक व सब रजिस्टार या दोन्ही पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
जळकोट शहरांमधील सागरचे वडील हे दत्तात्रेय बेलदरे हे एका अडत दुकानांमध्ये मुनीम म्हणून गत अनेक वर्षापासून काम करतात. घरची स्थिती अत्यंत हालाखीची आहे. दुकानामध्ये नोकर राहून दत्तात्रेय यांनी मुलगा सागरला शिक्षण दिले. सागरने यापूर्वी इंजीनियंिरग पूर्ण केले होते परंतु सागरचे मन त्या ठिकाणी लागले नाही, सागरला पूर्वीपासूनच मोठा अधिकारी होण्याची इच्छा होती . यामुळे सागर ने राज्य लोकसेवा आयोगाची तयारी केली, रात्रंदिवस अभ्यास केला. पहिल्या परीक्षेत एका गुणाने संधी हुकली , यामुळे सागर ने खचून न जाता पुन्हा प्रयत्न केले. वर्षभर अभ्यास करून सागरने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यामध्ये तो चांगल्या रॅकने उत्तीर्ण झाला. अखेर सागरची वर्णी राज्य कर निरक्षक म्हणून लागली आहे.
सागरने वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. अतिशय हलाखीच्या व गरीब स्थितीत शिक्षण पूर्ण करून राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जळकोट येतील आडत व्यापा-यांच्या वतीने सागर दत्तात्रय बेलदरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बळीराम धुळशेट्टे, माधव वारे, विश्वनाथ म्हेत्रे, संतोष पवार, मल्लिकार्जुन मरतूळे, विजय भ्रमन्ना, गंगाराम धुळशेट्टे, मारोती टाले, प्रभाकर सोनटक्के, अविनाश कोडगीरे, बाळू गोंड, माधव अंकलगे, धुळशेट्टे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. या यशाबद्दल जळकोट शहरांमधून सागरचे अभिनंदन केले जात आहे.