23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात शृंगारेंना केवळ ५०० चे मताधिक्य

जळकोट तालुक्यात शृंगारेंना केवळ ५०० चे मताधिक्य

जळकोट : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे हे मताधिक्याने विजयी झाले. सलग दहा वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेला मतदारसंघ राज्याचे माजी वैद्यकीय श्क्षििण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नियोजनामुळे काँग्रेसच्या ताब्यात आला. जळकोट तालुका हा पूर्वी काँग्रेसचा गढ समजला जायचा परंतु गत काही वर्षापासून तालुक्यात भाजपाची ताकद वाढत वाढली. असे असले तरी या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार सुधाकर  शृंगारे यांना जळकोट तालुक्यामधून केवळ पाचशे मताची लीड मिळाली आहे.
जळकोट तालुक्यामध्ये राज्याची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती तरीही जळकोट तालुक्यात भाजपा उमेदवाराला लीड मिळाली नाही. जळकोट तालुक्यामध्ये यावेळी मनोज जरांगे फॅक्टर जोरदार झाल्याची चर्चा आहे. जळकोट शहरामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपाच्या उमेदवारापेक्षा चारशे मतांची आघाडी मिळाली.  शहरामध्ये भाजपाने लीड मिळविण्यासाठी प्रयत्न केला मात्र भाजपाला लीड मिळू शकली नाही. काँग्रेसचे नेते मेहताब बेग व नुर पठाण यांच्या  मंगरूळ गावांमध्ये काँग्रेस उमेदवारला तब्बल ५०० मताची लीड मिळाली. भाजपाचे धर्मपाल दिवशेट्टे, यांच्या बेळसांगी गावांमध्ये भाजपाला लीड मिळाली, अविनाश नळदवार यांच्या वांजरवाडा मध्ये भाजपाला लीड मिळाली.
चंदन पाटील नागरगोजे यांच्या सोनवळा गावामध्ये भाजपाला लीड मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील यांच्या गावामध्ये भाजपाला लिड मिळाली.जळकोट तालुक्यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला दहा हजार मताची लीड मिळेल अशी चर्चा भाजपाचे कार्यकर्ते करीत होते. मात्र भाजपाच्या उमेदवाराला नाममात्र लीड जळकोट तालुक्यामधून मिळाली आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी अनेक विकास कामे करूनही जळकोट तालुक्यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला म्हणावे तेवढी मते मिळाली नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR