16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरजळकोट तालुक्यासाठी लवकरच स्वतंत्र बस डेपो

जळकोट तालुक्यासाठी लवकरच स्वतंत्र बस डेपो

जळकोट : ओंमकार सोनटक्के
जळकोट शहरात नूतन बस स्थानक इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याची क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पार पडले. या अध्यक्षस्थानी जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोंिवदराव केंद्रे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे , भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र केंद्रे , उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक धर्मपाल देवशेट्टे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोपा, माजी तालुकाध्यक्ष अरंिवंद नागरगोजे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार ,बालाजी आंदे, परिवहन अधिकारी अश्वजीत जानराव, माजी चेअरमन गणपत धुळशेट्टे, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष संगमेश्वर टाले , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम डावळे, नायब तहसीलदार राजाराम खरात, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सत्यवान दळवे, संग्राम हासुळे , खादर लाटवाले, माजी संचालक गजानन दळवे पाटील, अ‍ॅड तात्या पाटील, समद शेख, इब्राहिम देवर्जनकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोकराव डांगे यांची उपस्थिती होती.
कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, जळकोट शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत शहरातील सर्व पुतळे बसणे गरजेचे आहे. येथील प्रशासकीय इमारतीचे काम लवकर पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या.  येणा-या काळात जळकोट शहरात अंडरग्राउंड ड्रेनेज केले जाणार आहेत. जळकोट शहराचा डीपी प्लॅन संदर्भात येणा-या अधिवेशनात मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे तसेच जळकोटला लवकरच न्यायालय सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी निर्णय झाला असून राज्यांत साठ हजार किलोमीटरचे ग्रामीण भागातील रस्ते करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. जळकोटला एक मॉडेल तालुका करावयचा आहे, असे नामदार बनसोडे यांनी  सांगितले.
माजी आमदार गोंिवद केंद्रे म्हणाले की, काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येत असून मन्मथप्पा तुम्ही आता एकटेच काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमास भाजपचे शहराध्यक्ष शिवानंद देशमुख, माजी उपसभापती गोंिवदराव माने, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बालाजी केंद्रे, आगारप्रमुख तिडके, नगरसेवक संजय देशमुख, माजी संचालक दिलीप कांबळे, सत्यवान पांडे, श्रीकृष्ण पाटील, प्रशांत चोले, रवी गोरखे, सुरज गीते, यादवराव केंद्रे, बालाजी आगलावे, रामचंद्र पाटील, मंगेश गोरे, पाषा शेख, महेश सातापुरे, बाबुराव पाटील, हणमंत पाटील, ज्ञानेश्वर भोपळे, दामोदर बोडके, शंकर धुळशेट्टे, रत्नाकर केंद्रे, संतोष पवार, पंडित नामवाड, डीवायएसपी कल्याणकर, पोलीस निरीक्षक काकडे, सरपंच चंद्रशेखर पाटील, मेहताब बेग, नगरसेवक सुरेखा गवळे, संदीप डांगे, गोंिवद भ्रमना, गजू किडे, संग्राम कदम , विनायक जाधव , विनायक डांगे, गबाळे कृष्णा , बालाजी धुळशेट्टे , बाळू देवशेट्टे , यांच्यासह जळकोट शहर तसेच तालुक्यातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार गोंिवद केंद्रे, अश्वजीत जानराव, व्यंकट पवार, रामराव राठोड, संगमेश्वर टाले, अर्जुन आगलावे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR