जळकोट : प्रतिनिधी
राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून जळकोट येथे मिनी एम. आय. डी . सी मंजूर झाली आहे. या एम . आय . डी . सी ची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे . मुंबई येथील एम. आय. डी सी.चे उपमुख्य अधिकारी सोनाली मुळे यांनी शुक्रवारी पाहणी केली. वेळी त्यांनी याबाबत कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील उद्योगाना चालना मिळावी यासाठी क्रिडा मंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट येथे मिनी एम.आय.डी ची मंजूर करुन घेतली आहे. यासाठी लागणारी जागा देण्यासाठी शेतक-यांनी सहमती दिली आहे.
त्यामुळे प्रक्रिया वेगाने सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे कॅबिनेटमंत्री संजय बनसोडे यांनी चार दिवसापूर्वी बैठक घेऊन एम. आय. डी. सीच्या प्रक्रियेबद्दल तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मुंबई येथील एम. आय. डी.सोचे वरिष्ठ अधिका-यांनी शुक्रवारी एम.आय.डी.जागा, लागणारे रस्ते, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा या लागणा-या गोष्टी पजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही बाबत सूचना दिल्या. यावेळी मुंबई उपमुख्यकार्यकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, कार्यकारी अभियंता रमेश गुंड, क्षेत्र व्यवस्थापक सी.डी. आसनेवार, प्रमुख भूमापक एम.पी. नरवाड, भूमापक फुलचंद कातकडे, सुशांत खेर, कनिष्ठ अभियंता ओंकार चिराजदार, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, मंडळ अधिकारी कमलाकर पन्हाळे, तलाठी विश्वनाथ धुप्पे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.