17.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरजळकोट येथे ९ गोवंशांची सुटका

जळकोट येथे ९ गोवंशांची सुटका

लातूर : प्रतिनिधी
जळकोट शहरातील सरकारी दवाखाना मागे सैदू मौलासाब शेख रा. शिवाजी चौक यांनी त्याचे मालकी हक्काचे जागेत एका छोटया पत्र्याच्या  शेडमध्ये गोवशं जातीची एकूण ९ गोवंंश कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतूक करून आणले, अशी माहिती जळकोट पोलिसांना मिळाल्यावरुन  पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ते पशुधन ताब्यात घेऊन घोणशी येथील जगदंबा फाउंडेशनच्या गोशाळेत पाठविण्यात आले.
जळकोट पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे विचारपूस केली असता त्याठिकाणी हजर असणारी व्यक्ती कासीम बाबूनिया खुरेशी यय ३५ रा आंबेडकर चौक जूना बस स्टॅन्ड जळकोट, सैदू मौलासाब शेख वय ३२ रा जामा मस्जिद शेजारी जळकोट, रशीद बाबूनिया खाटीक वय ३८ रा जळकोट आंबेडकर चौक जूना बसस्टॅन्ड यांनी  सदरचे गोवंश ही आमचे मालकीची असून आम्ही व्यापारी आहोत असे सागितले. यावेळी पोलिसांनी त्यांना सदरगोवंशाचे दाखले असतील तर ते आम्हास सादर करावेत असे  सांगितले.  सदरील गोवंशी पत्र्याच्या शेडमध्ये मोबाइलच्या प्रकाशात पाहिले असता तेथे अंत्यत दाटीवाटीने एकूण ९ गावेश ही बांधलेली दिसून आली. सदर ठिकाणी गोवशांचे मलमूत्रनिचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती तसेच सदर गोवंशाना कोणताही चारा पुरविण्यात आला नव्हता व त्यांना पिण्याची पाण्याची कोणतीही सोय तेथे केलेली दिसून आली नाही एकंदरीत सदर गोवंशाची  उपासमार केली असल्याचे जळकोट पोलिसाच्या निदर्शनास दिसून आले.
काही गोवंशाचे अंगावर जखमांचे वळ उमटलेले दिसून आले. पोलिसांना दाखल करण्यात आलेल्या दाखल्यामध्ये समाधानकारक नोंद नसल्याचे दिसून आले.  आरोपी नामेकासीम बाबूमिया खुरेशी वय ३५ व इतरांनी पोलीसांना सांगितले की गोवंशाचे मूळ दाखले आमचेकडे आहेत व आपणास सादर केलेले दाखले हे नजरचुकीने सादर केलेले आहेत. दरम्यान या गोवंशास घोणसी येथे काही काळासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. जळकोट शहरातील महेश नागोराव देशमुख ,राहूल धोडिबा मूसळे यांच्या माहितीवरून ९०, ५०० रुपये किमतीचे  ९ गोवंश घटनास्थळावरुन आरोपीतच्या  ताब्यातून घेतले  व सदरचे गोवंश हे गोशाळेत पाठविण्यात आली. या प्रकरणात रामदास माधव धुळशेटटे वय ३१ रा जळकोट , कैलास लक्षमण मोटे वय २२ रा जळकोट , कैलास सदाशिव सूरनर वय २४ रा जळकोट, प्रभाकर दत्तात्रय वंजे वय २५ रा जळकोट, दिनेश बालाजी सिंदाळकर वय ३० रा जळकोट, रामदास भगवान वंजे वय ३१ रा जळकोट या युवकांनी मदत केली
बाबूमिया खुरेशी गोवशं खरेदी विक्रीचा दाखल्याचा दस्त हजर करण्याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे अधिनियमकलम ९४ प्रमाणे नोटीस देऊन  दि २७  ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हजर करण्यास सागितले परंतु, असा कोणताही मालकी हक्काचा दस्त ते  सादर करु शकले नाहीत. त्यामुळे जळकोट पोलिसांना घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले गोवंश हे कुठून तरी कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करून आणून त्यांना पत्र्यांच्या शेडमध्ये अतिशय दाटीवाटीने डांबून ठेवून त्यांचे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता उपासमार केली व त्या गोवंशांना निर्दयपणे  वागवल्याचे दिसून आले. प्रकरणी जळकोट पोलिसांनी तीन जणाविरुद्ध  पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार सिद्राम बाचावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० ,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ , महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९०६ ,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR