लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यात प्रथमच जिल्ह्यातील जवळपास ९६ शाळेत नाविन्य पूर्ण उपक्रम ‘जि प च्या शाळेत क्रिडागंण’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नरेगाच्या अंतर्गत बामणी ता. उदगीर येथे क्रीडांगणाचे भूमिपूजन मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ठिकाणी ५ हजार वृक्षाची लागवड बिहार पॅटर्न मधून करण्यात आली.
या कार्यक्रमास नरेगा गटविकास अधिकारी संतोष माने, उदगीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सूरडकर, तहसीलदार राम बोरगांवकर, बामणीचे सरपंच बिराजदार व गावकरी मोठया संख्येने उपस््िथत होते. लातूर जिल्हा शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखला जातो व शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाची लोकसंख्या जास्त आहे. ग्रामीण भागातील मुलांची शारिरिक तंदुरुस्ती आणि सामर्थ्य पाहता विविध खेळाचे मैदान मिळाल्यास निश्चितच जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू घडणार आहेत. मुलांना खेळासह विविध क्षेत्रात करिअर करताना खेळाडूमध्ये असणारी जिदद, चिकाटी मदतीची ठरणार आहे.
या सर्व क्रिडांगणाची कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात विकसीत होणा-या या ९६ क्रिडांगणे व त्याभोवतालची वृक्षलागवड व संगोपन यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जवळपास ७.५० कोटी रूपायाचा खर्च होणार आहे