22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रजिल्­ह्याच्या नामांतराला रेल्­वे मंत्रालयाचा हिरवा कंदील!

जिल्­ह्याच्या नामांतराला रेल्­वे मंत्रालयाचा हिरवा कंदील!

 मंत्री विखे पाटील यांनी दिली मोठी माहिती

अहमदनगर –
जिल्­ह्याला अहिल्­यानगर नाव देण्­यास केंद्रीय रेल्­वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून, हे नाव देण्­यास विभागाची कोणतीही हरकत नसल्­याचे पत्र दिल्­याने जिल्­ह्याच्­या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्­याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्­ण विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्­ह्याला पुण्­यश्­लोक अहिल्­यादेवींचे नाव देण्­याची मागणी झाल्­यानंतर राज्­यातील महायुती सरकारने अहिल्यानगर असे नाव देण्­याचा महत्­त्वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्­या बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्­या अखत्­यारीत पूर्ण होत असल्­याने प्रत्­येक विभागाची ना हरकत आवश्­यक असते.

केंद्रीय रेल्­वे मंत्रालयाने नामांतराच्­या बाबतीत हरकत नसल्­याचे पत्र जारी करून, अहिल्­यानगर नावास मान्­यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्­वेस्­थानक देशात नसल्­याचेही त्­यांनी आपल्­या पत्रात नमूद केल्­याने जिल्ह्याला अहिल्­यानगर नाव देण्­यातील पहिला टप्­पा पूर्ण होत असल्­याचे मंत्री विखे पाटील म्­हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR