24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरजिल्ह्यातील धरणांमध्ये ८.०८ टक्केच पाणीसाठा

जिल्ह्यातील धरणांमध्ये ८.०८ टक्केच पाणीसाठा

लातूर : प्रतिनिधी
जुलै महिना निम्म्यावर आला तरीी जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्याप पावसाने समाधानकारक सुरुवात केल्याचे दिसत नाही. परिणामी जिल्ह्यातील १४४ धरणांमध्येही अत्यल्प म्हणजेच केवळ ८.०८ टक्केच पाणीसाठा आहे. आठ मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणी असून तीन प्रकल्पांमध्ये अद्यापही उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आहे.
जिल्ह्यात या पावसाळ्यात अपेक्षित सरासरीच्या १५८.३ टक्के पाऊस झालेला आहे. पण, जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १४४ प्रकल्पांत कव्ोळ ८.०८ टक्क्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तीन मध्यम प्रकल्पांत तर उपयुक्त पाणीसाठा नाही. मांजरा प्रकल्पातदेखील केवळ चार सेंटीमीटर पाणीसाठा वाढला आहे. मृतसाठ्यातूनच लातूर शहराला पाणीपुरवठा सध्या केला जात आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, तिरु आणि व्हटी या तीन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा नाही. मृतसाठ्यातच पाणी आहे. या आठ मध्यम प्रकल्पांचा एकुण पाणीसाठा २८.१४८ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. यात १४.९६४ मृतसाठा तर १३.१८४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आ.े याची टक्केवारी १०.७९ एवढी आहे.
जिल्ह्यात १३४ लघू  प्रकल्प आहेत. याची साठवण क्षमता ५१.५१३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पांत २९.५८४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून याची टक्केवारी ९.४१ एवढी आहे. अनेक प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मांजरा धरणात ४४.१९७ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. दोन दिवसांत केवळ चार सेंटीमीटरने पाण्यात वाढ झाली आहे. निम्न तेरणा प्रकल्पात एकुण ४४.१२८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यात उपयुक्त पाणीसाठा १४.१६१ तर मृतसाठा २९.९७ दशलक्ष घनमीटर एवढा आहे.
जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांत १३.१८४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तावरजा, व्हटी, तिरु प्रकल्पांत अद्यापही उपयुक्त पाणीसाठा झाला नाही. रेणापुर मध्यम प्रकल्पात ४.७५९, देवर्जन ०.३०९, साकोळ ०.३४०, घरणी ०.७७६, मसलगा ६.९९९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पांत पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसांची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८५.८ मिली मीटर पावस झाला आहे. गत वर्षी याच तारखेपर्यंत १४०.७ मिली मीटर पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला तरी मोठया पावसाची प्रतिक्षा मात्र कायम लागुन आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR