25.4 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeलातूरजिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये अतिवृष्टी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्हाभरात रात्रभर मृगाचा जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील ६० पैकी ३४ मंडळांमध्ये पावसाने अतिवृष्टीची नोंद णाली. यामध्ये निलंगा तालुक्यातील १० पैकी १० मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत एकुण ६३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जळकोट तालुक्यात सर्वात कमी ९.८ मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ, बोकनगाव येथे मांजरा नदीला पाणी आले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकरी सुखावला असून मशागतीची कामे जवळपास बहूतांश ठिकाणी पुर्ण झालेली आहेत. गतवर्षीच्या जेमतेम पावसाने अडचणीत आलेला शेतकरी यंदा समाधानकारक पाऊस असल्याच्या अंदाजाने आशाळभूत झालेला आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ऐन मृग नक्षत्राच्या प्रारंभीपासूनच पावसाने मध्यम, हलक्या स्वरुपाची हजेरी लावून समाधानकारक संकेत दिल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. सोमवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सुरु झालेला दमदार
पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत सुरुच होता.
लातूर तालुक्यातील लातूर-६९.३ मी. मी., बाभळगाव-६९.३, हरंगुळ-६९.३, कासाखेडा-१०६.८, मुरुड-११५.८, तांदुळजा-६९.३, चिंचोली-६८.३ व कन्हेरी-७४.८ मिली मीटर पाऊस झाला. लातूर तालुक्यातील ९ मंडळांपैकी ८ मंडळांत अतिवृष्टी झाली. औसा तालुक्यातील औसा-८०.८, लामजना-१०२.०, मातोळा-८०.८, भादा- ८०.८, बेलकुंड-८०.८, किणी-९१.५, किल्लारी १०२.० मिली मीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यातील ८ पैकी ७ मंडळांत अतिवृष्टी झाली. अहमदपुर तालुक्यातील ६ पैकी एकाही मंडळात अतिवृष्टी झाली नाही. या तालुक्यात ४१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
निलंगा तालुक्यातील निलंगा-१११.५, पानचिंचोली-८१.०, निटूर-८७.८, औराद शहाजानी-८४.०, कासारबालकुंदा-८०.०, अंबुलगा-९९.०, मदनसुरी-९७.३, कासार शिरसी-६६.८, हलगरा-८४.०, भुतमुगळी-६६.८ मिलीमीटर पावसाची नोंंद झाली. निलंगा तालुक्यातल १० पैकी १० मंडळांत अतिवृष्टी झाली. या तालुक्यात एकुण ८८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उदगीर तालुक्यात ८ मंडळं आहेत. यापैकी एकाही मंडळात अतिवृष्टी झाली नाही. या तालुक्यात १६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चाकुर तालुक्यात चाकुर-१००.८, नळेगाव-७८.८, आष्टा-११२.५ या तीन मंडळात अतिवृष्टी झाली. चाकुर तालुक्यातील ५ पैकी ३ मंडळांत अतिवृष्टी झाली. या तालुक्यात एकुण ७७.३ मिलीमीटर पाऊस झाला.
रेणापूर तालुक्यात रेणापूर-८२.०, पोहरेगाव-६५.५, पानगाव, पळशी-८४.५ मिलीमीटर पाऊस झाला. या तालुक्यातील ५ पैकी ४ मंडळांत अतिवृष्टी झाली. देवणी तालुक्यात ३ मंडळं आहेत. यातील एकाही मंडळात अतिवृष्टी झाली नाही. या तालुक्यात २४.६ मिलीमीटर पाऊस पडला. शिरुर अनंतपाळ तालुक्यात शिरुर अनंतपाळ-८७.८, हिसामाबाद-८७.८ मिलीमीटर पाऊस झाला. या तालुक्यातील ३ पैकी २  मंडळांत अतिवृष्टी झाली. या तालुक्यात एकुण ७४.३ मिलीमीटर पाऊस झाला. जळकोट तालुक्यात २ मंडळं आहेत. त्यातील एकाही मंडळात अतिवृष्टी झाली नाही. या तालुक्यात सर्वात कमी ९.८ मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत एकुण ६३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR