25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeलातूरजिल्ह्यात पुन्हा हॉट बिजनेसला सुरुवात!

जिल्ह्यात पुन्हा हॉट बिजनेसला सुरुवात!

लातूर : विनोद उगीले

शहरातील विविध भागात असलेल्या कॉफी शॉप आणि कॅफेवर पोलिस पथकांनी जवळपास सहा महिन्यापूर्वी छापे मारले होते. नियमांचे उल्लंघन करणा-या २४ कॅफेचालकांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने कॉफी शॉप, कॅफेचालकांचे काही काळ धाबे दणाणले होते. पण परत पुन्हा लातूर शहरासह जिल्ह्यातील मोठ्या शहरात या हॉट बिजनेसला सुरूवात झाली आहे. लातूरसह जिल्ह्यातील कॉफी शॉप आणि हॉटेलबाबत पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस पथकांनी जून महिन्यात लातूरसह जिल्ह्यातील २४ कॉफी शॉप, कॅफेवर एकाचवेळी छापे मारले. याबाबत विविध पोलिस ठाण्यांत २४ कॉफी शॉप, कॅफेचालकांविरोधात गुन्हे दाखल केले होते.

या कारवाईचा धसका घेत संबधित व्यावसायिकांनी आपले व्यवसाय काही काळासाठी बंद ठेवले होत तर काही जणांनी या व्यवसायाला कायमचा रामराम ही ठोकला. पण या कारवाई विसर जसजसा पडतोय तसतसे काहीजण पुन्हा हा व्यवसाय थाटताना दिसून येत आहेत. कॉफी चालकांवर निर्बंध नसल्याने, कॅफे आणि हॉटेलमध्ये निमयबा गोष्टींना चालना मिळत आहे. नमयबा गोष्टींना चालना मिळेल अशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून येत आहे. परिणामी, कॉफी शॉप अन हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा वावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे दिसून येत आहे. ठराविक कालावधीसाठी कॉफी शॉप, कॅफे, हॉटेलचालक शुल्क आकारून नको त्या बाबींना चालना देत असल्याच हीे समोर येत आहे. यातून कॉफी शॉप, हॉटेलमध्ये युवक-युवती अन अल्पवयीन मुले-मुली तासन्तास बसून चुकीचे वर्तन करत असल्याचे आढळून बोलले जात आहे. अशा कॉफी शॉप, कॅफे आणि हॉटेलवर पोलीस प्रशासनाने पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता असून तशी मागणी ही जिल्ह्यातील सुजान नागरिकांतून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR