27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरजिवे मारण्याची धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

जिवे मारण्याची धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील विठ्ठलनगर वडारवस्ती कातपूर रोड येथे राहणा-या एका महिलेने तिला व तिच्या पतीला जिवेमारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून दि. ६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान सदर मयत महिलेच्या वडिलांनी ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या मयत मुलीची तक्रार घेतली नाही तसेच तिला अपमानास्पद वागणूक दिली असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे  केली. याची चौकशी केली असता यात एक पोलीस कर्मचारी दोषी आढळून आल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलनगर वडारवस्ती कातपूर रोड येथे राहणा-या अनिता बालाजी लष्करे वय ३० वर्षे या महिलेस व तिचे पती बालाजी लष्करे यांना सुभाष गंगाराम लष्करे, बाळु गंगाराम लष्करे, रावसाहेब गंगाराम लष्करे, राजु गंगाराम लष्करे, सुरेश मारोती लष्करे, राहुल बाळु लष्करे सर्व रा. विठ्ठल नगर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या कारणावरून अनिता बालाजी लष्करे या महिलेने दि. ६ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आरटिओ ऑफिस समोरील वैशालीनगर परिसरातील विहीरीत उडीमारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी मयत महिलेचे वडिल तुकाराम चिमा इटकर  वय ५० वर्षे रा. सिकंदरपूर, लातूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपी विरोधात  स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दि. ७ रोजी दुपारी कलम ३०६,५०६,३४ भादविनुसार गुन्हा दाखल केला  असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पो.उप.नि. कांबळे हे करीत आहेत
.
      दरम्यान दि. ७ रोजी याप्रकरणात मयत महिलेच्या वडिलांनी जिवे मारण्याची घमकी देणा-या विरोधात माझी मुलगी पोलिसांत तक्रार देण्यास जाऊन देखील तक्रार दाखल करून घेतली नाही.  पोलिसांनी अपमानजनक वागणूक दिली म्हणून तीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी तरच आम्ही मयत अनिताचा मृतदेह ताब्यात घेऊ अशी भुमिका घेत अशा आशयाचे एक निवेदन आज एका शिष्टमंडळाने पोलीस  अधीक्षक लातूर यांना दिले असून याची चौकशी केली असता त्यात रतनलाल शेख नामक कर्मचारी दोषी आढळल्याने त्याचे विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR