22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीजीवन ज्योत विम्याचा धनादेश जोंधळे यांच्या वारसांना सुपूर्द

जीवन ज्योत विम्याचा धनादेश जोंधळे यांच्या वारसांना सुपूर्द

पालम : तालुक्यातील फरकडा येथील रहिवासी मरीबा देवीदास जोंधळे या बँक खातेदाराचा मृत्यू हृदय विकाराने झाला. त्याच्या वारसाला २ लाखांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला आहे.

फरकडा येथील रहिवासी तथा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदार मरीबा जोंधळे हे दि. २६/०८/२३ रोजी हृदय विकाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत ४३६ रुपयांचा विमा काढला होता.

सदर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत २ लक्ष रक्कमेचा धनादेश क्षेत्रिय विभागीय अधिकारी नितीन वरुडकर यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेला रक्कमेचा धनादेश शाखा व्यवस्थापक संदीप ए पट्टेबहादुर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बँकेचे आर. ए. धकाते, ए. एम. राने, बी. एन. पौळ, शिवानंद स्वामी, संजय शिंदे आदि उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR