29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeलातूरज्ञानेश्वर विद्यालय हा गुणवत्तेचा पॅटर्न

ज्ञानेश्वर विद्यालय हा गुणवत्तेचा पॅटर्न

प्रा. शिवराज मोटेगावकर यांचे प्रतिपादन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील पूर्व भागामध्ये ज्ञानेश्वर विद्यालयाने आपल्या गुणवत्तेने एक आदर्श असा ज्ञानेश्वर पॅटर्न तयार केला असून त्यामुळे अनेक घरामध्ये प्रकाश निर्माण करण्याचे कार्य या विद्यालयाच्या माध्यमातून झालेले आहे. असे प्रतिपादन प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी केले. ज्ञानेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विक्रमजी गोजमगुंडे हे होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हादराव दुडीले, सचिव डी.एन.दादा शेळके, कोषाध्यक्ष विनायकराव पिनाटे सहसचिव विठ्ठलराव इगे, संचालक, प्रा. प्रकाशराव शिंगडे, अ‍ॅड. भारतजी साबदे, नाथरावजी कोल्हे, डॉ. सोपानराव जटाळ, तसेच विद्यालयाच्या मु.अ. मलवाडे एस.एम., उपमु.अ. क्षीरसागर एम.के., पर्यवेक्षक बैनगिरे एम.एस.,पाटील मॅडम आदी उपस्थित होते.

दहावी बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा ९६.९१ टक्के निकाल लागलेला आहे. कु. गायत्री नागेश मलवाडे ४८५ गुण घेवून सर्वप्रथम, सुजल सुमित तोडगिरे४८२ गुण घेवून द्वितीय, चि. हर्षवर्धन शत्रुघ्न जाधव ४७९ गुण घेवून तृतीय, कु. अनुष्का सतिश साबदे ४७७ गुण घेवून चतुर्थ व चि. यश दयानंद म्हेत्रे ४७७ गुण घेवून चतुर्थ क्रमांक पटकावलेले आहेत. तसेच विद्यालातील ९० टक्के व त्यापेक्षा जास्त टक्केवारी घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या एकूण ४७ आहे.

इ. १२ वी बोर्ड परीक्षेत विज्ञान विभागाचा निकाल ९६.९२ टक्के लागला असून यामध्ये ८२.१७ टक्के घेवून कु. जानापूरे रूपाली जगन्नाथ ही सर्वप्रथम आली तर ७८.०० टक्के गुण घेवून कु. बागवान निदा महमदअली ही द्वितीय आली व ७३.६७ टक्के गुण घेवून मुंगळे नौशीन गफार ही तृतीय आली आहे.
कला शाखेतून ७८.६७ टक्के गुण घेवून कु. शेख नाजिया मज्जिद ही सर्वप्रथम आलो तर ७८.५० टक्के गुण घेवून कु. शेख मुस्कान अल्लाउद्दीन ही द्वितीय आली व ७०.६७ टक्के गुण घेवून कुं. हुलगुंडे गायत्री बालाजी ही तृतीय आली आहे.

वाणिज्य शाखेतून ८३.१७ टक्के गुण घेवून कु. शेख महेकबी शाबोधीन ही सर्वप्रथम आली तर ८२.१७ टक्के गुण घेवून कु. लाड संजना सोमनाथ ही द्वितीय आली व ७६.००टक्के गुण घेवून कु. शेख महेक युनूस हो तृतीय आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एस. एम. मलवाडे, यांनी केले. याप्रसंगी डी.एन.दादा शेळके यांनी मार्गदर्शन केले, तर विक्रमजी गोजमगुंडे यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुणांना ओळखुन आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करावा. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिगुंठे एम.एल. यांनी तर आभार खंदाडे व्ही. एस. यांनी केले..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR