दिंडोरी : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीमधील दोन्ही शरद पवार गट व अजित पवार गट जोरदार तयारीला लागले आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये वडील विरुद्ध पुत्र अशी लढत होण्याची शक्यता आहे. गोकुळ झिरवळ यांच्या सभेच्या उपस्थितीने चर्चांना उधाण आले.
दरम्यान, राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडांचे राजकारण झाल्यानंतर आता ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट जोरदार तयारी करत आहेत. शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा तर अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत मंचावर नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे दिसले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मागील वर्षी अजित पवार यांनी पक्षामध्ये बंड करत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांनी अजित पवार यांची साथ दिली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. नरहरी झिरवळ यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे कोणासोबत जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता गोकुळ झिरवळ हे शरद पवार यांच्यासोबत एका मंचावर दिसले आहेत. गळ्यात शरद पवार गटाचे उपरणे घालून गोकुळ झिरवळ हे मंचावर उपस्थित राहिले होते.