मुंबई : पाच वर्षांपूर्वी केवळ ५६ रुपयांत मिळणारा झेन टेक्नॉलॉजीजचा शेअर आज १९५४३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना ३३८० टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे. थेट रकमेचा हिशेब केल्यास झेन टेकच्या शेअरमध्ये ५ वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक करणा-याचे पैसे आज जवळपास ३५ लाख रुपये झाले आहेत, यामुळे झेन टेकचे शेअरधारक मालामाल झाले आहेत.
अँटी ड्रोन निर्माता झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर आज १९००.९० रुपयांवर उघडला आणि १९५४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. जूनपासून या शेअरमध्ये ११५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. झेन टेक्नॉलॉजीजने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने १.६०१ रुपये प्रति शेअर या दराने क्यूआयपीला ६.२५ दशलक्ष इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. झेन टेक्नॉलॉजीजने २१ ऑगस्ट २०२४ रोजी क्यूआयपी लाँच केला होता आणि २३ ऑगस्ट २०२४ रोजी बंद झाला होता. या क्यूआयपीसाठी देशी-विदेशी गुंतवणूकदारांमध्ये मोठी चुरस होती.
दरम्यान, कोटक म्युच्युअल फंड, व्हाईट ओक ऑफशोर फंड, व्हाईट ओक म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड आणि बंधन म्युच्युअल फंड या प्रमुख गुंतवणूकदारांनी या क्यूआयपीमध्ये भाग घेतला.