लातूर : प्रतिनिधी
दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी भाजपच्या शेतकरी. नेत्यांनी ंिदडी काढली ते सत्तेवर आले पण सोयाबीनचे भाव वाढले नाहीत ते ंिदडी काढणारे कुठे आहेत, असा सवाल राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करीत राज्याच्या सत्तेवर बसलेले महायुती सरकार हे भ्रष्ट असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केला.
रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद बैठक आयोजीत करण्यात आली होती त्यावेळीं ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, लालासाहेब चव्हाण, रेणाचे संचालक आकनगिरे, गजानन चेवले, बाजार समितीचे उपसभापती अॅड शेषराव हाके, रेणाचे माजी संचालक भगवानराव पाटील, अण्णासाहेब पाटील, कोंग्रेसचे मीडिया प्रमुख हरिराम कुलकर्णी हे उपस्थित होते
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सिंधगाव येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे सांगून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व भाजपा पदाधिका-यांंचा सन्मान ठेवून प्रत्येकास काम करण्याची संधी देणार आहे. आमच्या विश्वासावर आपण प्रवेश केलेला असून विकासाच्या बाबतीत आम्ही कधीही कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली
याप्रसंगी माजी सभापती दिलीप पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, सुग्रीव मुंडे चंद्रकांत पाटील, अँड रमेश पाटील, प्रभाकर केंद्रे, रेणाचे संचालक स्रेहल देशमुख रेणाचे संचालक संभाजी रेड्डी, रेणाचे संचालक स्रेहल देशमुख, माजी संचालक विश्वासराव देशमुख, संचालक डॉ हरिदास, कांबळे, जिल्हा बँकेच्या माजी संचलिका श्रीमती शिवकन्या ंिपपळेताई, माजी संचालिका सौ इंदुमती इगे, पवार हे उपस्थित होते.