18.3 C
Latur
Sunday, November 17, 2024
Homeलातूरटिका करणा-यांना करू देत, माझं लक्ष्य फक्त लातूरचा विकास

टिका करणा-यांना करू देत, माझं लक्ष्य फक्त लातूरचा विकास

लातूर : प्रतिनिधी
निवडणुका लोकशाहीचा उत्सव असतो. त्यात सर्वांनी आनंदाने सहभागी व्हायचे असते. आपल्या पक्षाचे ध्येय, धोरण, केलेल्या विकास कामे, आपला विचार आणि पुढे आपण काय करणार आहोत, याचा उहापोह निवडणुकीत होणे आवश्यक असते. परंतू, गेली तेरा दिवस विरोधकांकडून माझ्यावर टिका केली जात आहे. टिका करणे सोपे असते. प्रत्येक टिकेला उत्तर देता येऊ शकते, पण ते आपल्याला करायेच नाही. माझ लक्ष्य फक्त लातूरचा विकास करणे हेच आहे, असे प्रतिपादन काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार  माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत  उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृह अमितभैय्या देशमुख मित्र मंडळाच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास  पवार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड.  उदय गवारे, कमलकिशोर अग्रवाल, प्रकाश कासट, प्रा.  शिवराज मोटेगावकर, डॉ. चेतन सारडा, गिरीश ब्याळे, चंदुलाल बलदवा, प्रसाद उदगीरकर, संतोष तोष्णीवाल, डॉ. मनोज देशमुख डॉ. अशोक पोद्दार, अभय शहा, डा.ॅ  संतोष बिराजदार, डॉ. अशोक आरदवाड, व्ही. पी. पाटील, केतन हलवाई, अक्षय बनसोडे, डॉ. गिरीश कोरे, सय्यद युसुफ, तुकाराम पाटील, संदीप हजगुडे, बशीर शेख, अ‍ॅड. राजकुमार गंडले आदिसह डॉक्टर इंजिनिअर वकील प्राध्यापक व्यापारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचाराला मी गेलो आहे. २५ ठिकाणी मला प्रचाराला  जाता आले नाही, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, गेली २५ वर्ष आमचं कुठलही भाषण आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण झालेले नाही. बिनधास्तपणे आपण आपली वैचारिक लढाई लढली पाहिजे. आपण लातूरकर एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होतो. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. बेकारी, भ्रष्टाचार, महागाई कमी करणे, उद्योग स्थलांतर रोखण्याची आहे. या महत्वाच्या विषयावर निवडणुका झाल्या पाहिजेत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, सुरेश पेन्सलवार, प्रसाद उदगीरकर, रेखा नावंदर, चंदुलाल बलदवा, अ‍ॅड. उदय गवारे, प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रकाश कासट, रमेश बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. जयश्री पाटील, संभाजी सुळ, वाय. एस. मशायक, केतन हलवाई, प्रा. गोविंद घार, डी. एन. केंद्रे, अ‍ॅड. शेखर हविले, अ‍ॅड. दौलत दाताळ, व्यंकटेश पुरी, डॉ. राम बोरगावकर, फकीरा जोगदंड, अक्षय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक  कमलकिशोर अग्रवाल यानी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले तर डॉ. अशोक पोद्दार यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR