22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमुख्य बातम्याटिफिनमध्ये नॉन-व्हेज नेलेल्या विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा

टिफिनमध्ये नॉन-व्हेज नेलेल्या विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा

अलाहाबाद : टिफिन बॉक्समध्ये नॉन व्हेज अर्थात मांसाहारी जेवण आणल्याचा ठपका ठेवत तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांची शाळेच्या मुख्याध्यापकांनी हकालपट्टी केली. शाळेच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांच्या आईंनी थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देत जिल्हाधिका-यांना आदेश दिले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात विद्यार्थ्यांना दिलासा दिला. ही बाब घरी कळल्यानंतर मुलांच्या आईंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. याचिककर्त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे केली.

शाळेच्या मुख्याध्यापकाने मुलांनी नॉन व्हेज जेवण आणण्यावर आक्षेप घेतला. इतकंच नाही, तर त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने शाळेतून काढून टाकले, असे याचिककर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती सिद्धार्थ आणि न्यायमूर्ती एस.सी. शर्मा यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने अमरोहाच्या जिल्हाधिका-यांना निर्देश दिले की, त्यांनी दोन आठवड्याच्या आत मुलांचे सीबीएसईशी संलग्नित दुस-या शाळेत प्रवेश घेऊन द्यावा. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR