16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeपरभणीटेनिस हॉलीबॉल, फ्लोअरबॉल खेळाला राजाश्रय मिळवून देऊ : विनोद बोराडे

टेनिस हॉलीबॉल, फ्लोअरबॉल खेळाला राजाश्रय मिळवून देऊ : विनोद बोराडे

सेलू : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना खेळाची आवड लागली तर त्यांची शारीरिक तंदुरुस्ती ही बौद्धिक संपन्नतेकडे घेवून जाईल. आज भारतात खेलो इंडिया व इतर उपक्रमाबरोबरच देशी विदेशी खेळांची मोठी रेलचेल सुरू आहे. यामध्ये टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल खेळ मागे नाही. परंतु या खेळाला महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, यांच्यामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून राजाश्रय, समाज आश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल व फ्लॉवरबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे बोलत होते. नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर दि.१० फेब्रुवारी रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सत्यनारायणजी लोया तर प्रमुख उपस्थितीमध्ये टेनिस हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड, राज्य सचिव रवींद्र चौथवे, नूतन विद्यालय संस्था सचिव डॉ. विनायक कोठेकर, संदीप लहाने, दत्तराव पावडे, प्रभाकर सुरवसे, मिलिंद सावंत, रामेश्वर कोरडे, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. मान्यवरांना ६५० खेळाडूंनी मार्च पास करून मान वंदना दिली. क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करत राष्ट्रीय खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी योगासनपटुंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंची मने जिंकली. शालेय राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल स्पधेर्साठी वयोगट १४, १७ आणि १९ वषार्खालील मुला – मुलींचे संघ ७२ संघातील ६५० खेळाडूचा सहभाग असून अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, मुंबई या विभागातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील, सूत्रसंचालन गोपाल आम्ले तर आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी केले. नूतन विद्यालय क्रीडा विभाग प्रमुख तथा राज्य सचिव गणेश माळवे, पर्यवेक्षक डी.डी सोन्नेकर, के. के .देशपांडे टेनिस हॉलीबॉल परभणी जिल्हा सचिव सतीश नावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय भुमकर, किशोर ढोके, नागेश कान्हेकर, संध्या फुलपगार, रूपाली लाडाने, प्रतिज्ञा चव्हाण, कीर्ती राऊत, यमुना चव्हाण, संध्या आमटे, माधुरी कुंभार, अमृता नरके, ज्योती बिरादार, सुरेखा भांबळे, सुजाता रासवे, रूपाली चव्हाण, मनोज वाघमारे, नंदकिशोर चव्हाण, बाबासाहेब गोरे आदी प्रयत्नशील आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR