मुंबई : प्रतिनिधी
बस करा टोलवाटोलवी आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, असे म्हणत समाजसेवक अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका हीच अधिकृत भूमिका असेल, असे म्हटले.
त्यावरून समाजसेवक अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली.
समाजसेवक अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्यानुसार, आता फडणवीस दिल्लीत म्हणाले की अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य आणि अजित पवार म्हणाले, जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो मान्य. मतितार्थ असा, की दोघांची आता खात्री पटली आहे की निर्णय घ्यायला हवा. पण कोण घेणार हे ठरत नाही. बस करा ही टोलवाटोलवी. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
आत्ता फडणवीस दिल्लीत म्हणाले की, अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य आणि अजित पवार म्हणाले, जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो मान्य.