24 C
Latur
Thursday, September 19, 2024
HomeFeaturedट्रकच्या धडकेत विमानाला भगदाड; १८० प्रवासी वाचले

ट्रकच्या धडकेत विमानाला भगदाड; १८० प्रवासी वाचले

 

पुणे : प्रतिनिधी
पुण्याहून दिल्लीला जाणा-या विमानाला पुश बॅक टग ट्रकची रनवे वरच धडक बसल्याने मोठा अपघात झाला. या धडकेमुळे विमानाला भगदाड पडल्याचे समोर आले आहे. यावेळी विमानातून १८० प्रवासी प्रवास करत होते, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

पुणे विमानतळावरून एअर इंडीया कंपनीचे विमान सायंकाळी ४ ते सव्वाचारच्या सुमारास दिल्लीकडे झेप घेण्यास सज्ज झाले होते. ते पार्कींगमधून रन वे वर येत असतानाच प्रवाशांची सामाने वाहून नेणा-या पुशबॅक मागून टग ट्रकने धडक मारली. आणि या पुणे-दिल्ली विमानाला भगदाड पडले. विमानतळ प्रशासनाने ही विमानसेवा रद्द करून एअर इंडीयाची रात्रीची ९:५५ वाजता पुणे ते दिल्ली या पर्यायी विमानसेवा प्रवाशांना व्यवस्था करून देण्यात आली.

याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्या संपर्क साधला त्यांनी याबाबत प्रतिसाद दिला नाही. बोलण्यास नकार दिला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून या विमानाची तपासणी सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR