17.5 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र'ट्रम्पेट' चिन्हाचे 'तुतारी' मराठी भाषांतर रद्द

‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ मराठी भाषांतर रद्द

शरद पवारांना मोठा दिलासा निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचं नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट या चिन्हाचा उल्लेख तुतारी असा करण्यात आल्यामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय महत्वाचा आहे. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपक्ष उमेदवारांनी ट्रम्पेट हे चिन्ह घेऊन लढले या चिन्हाच मराठीमध्ये भाषांतर तुतारी असे केलं होते. काही लोकसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने या ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे असलेल्या उमेदवारांना मिळाली. सातारा लोकसभेत याचा मोठा फटका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बसला होता. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने राज्याच्या निवडणूक अधिका-यांकडे याची तक्रार केली होती. यावरुन राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोकंिलगम यांनी आता राज्यातील अधिका-यांना नवीन आदेश दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR