28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार?

ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार?

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला आहे. मात्र आता केंद्राची फेर मतमोजणी करण्याची अनुमती दिली असल्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे.

अशातच आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मशिनची फेर मतमोजणीची मागणी केली होती. ती मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला आहे. महायुतीच्या भाजप उमेदवार सीमा हिरे यांनी १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळवून विजयाची हॅट्ट्रिक साधली. येथे आमदार हिरे या १५ उमेदवारांपैकी एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यांनी उर्वरित १४ उमेदवारांना पराभूत केल्याने ‘एक नारी, सबपे भारी’ असा नारा देत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा ६८ हजार १७७ मतांनी पराभव झाला. बडगुजरांना ७३ हजार ५४८ मते मिळाली. मनसेचे दिनकर पाटील ४६ हजार ६४९ मते घेऊन तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघांत मृत व्यक्तींच्या नावावरही मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशिनची फेर मतमोजणीची मागणी केली होती. ती मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR