26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी पुन्हा लांबणीवर

ठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिदेंना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती. परंतु कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आता यावर १४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हा आमदार, खासदारांच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आता १४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीख अपडेट करण्यात आली आहे.

आमदार अपात्रतेवर
२३ जुलैला सुनावणी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांना पात्र ठरवले होते. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर १९ जुलैला सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR